गडचिरोली : आठवडाभापूर्वी शहरातील महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर अचानक दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणाची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सक काही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माता मृत्यूप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या, दोन मुलींसह चौघांना अटक

२४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके(२३) रा.भानसी,ता.सावली,जि.चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे(२२),रा.मुरखळा चक,ता.चामोर्शी(हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली) भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी दोघींचीही शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली. प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु संध्याकाळी रजली शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

हेही वाचा >>> “प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”

दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. दोघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना दोघेही पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले असून दोषींवर कारवाई करून मृत मातांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp ashok nete directed to investigate two women death after caesarean delivery ssp 89 zws
Show comments