गडचिरोली : गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्याने वेळीच ‘एअरबॅग’ उघडले आणि खासदार नेते, चालक व सुरक्षारक्षक बचावले. नागपूरजवळील विहिरीगाव जवळ हा अपघात घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.

हेही वाचा – “…तर महाराष्ट्रातील अनेक नेते अडचणीत येतील”, एल्विश प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले? वाचा…

हेही वाचा – चंद्रपूर : माकडाची शिकार करायला गेला अन् जीवाला मुकला! डीपीवर चढलेल्या बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खासदार नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवासी सुखरूप बचावले. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. नेते हे सहकाऱ्यांसमवेत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचले. दरम्यान खासदार नेते यांना विचारणा केली असता त्यांनी सुखरूप असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे सांगितले.