नागपूर : काँग्रेसचे नवीन वस्ती टेका येथे कार्यकर्ता संमेलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘एमआईएम’च्या सुमारे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार असुद्दीन ओवैसी यांना हा धक्का मानला जात आहे.शहर काँग्रेसच्या ब्लॉक १४ तर्फे कार्यकर्ता संमेलन आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर काँग्रेसचे अध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे आणि ब्लॉक १४ चे अध्यक्ष दीपक खोबरागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘एमआईएम’चे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची शपथ घेतली. यावेळी इफ्तेखार अंसारी, ॲड. जितेंद्र वेलेकर, लालाजी जायसवाल, संदीप सहारे, इंद्रपाल वाघमारे, सलमान अंसारी, लुकमान अंसारी, जलील अंसारी प्रामुख्याने उपस्थित होते.