यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेची प्रतीक्षा उद्या गुरूवारी संपणार असल्याची चर्चा आहे. खासदार भावना गवळी या उमेदवारीसाठी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत वाटाघाटी करत असताना; यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार ठरविण्यामध्ये महत्वाची भूमिका असलेले पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळात परतले. त्यामुळे येथील उमेदवारीचे कोडे अधिकच गडद झाले.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस – रवी राणांची विमानतळावर भेट, नवनीत राणांच्‍या उमेदवारीवर…

maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

मंगळवारी शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांना घाबरण्याचे कारण नाही, तिकीट वाटप अंतिम टप्यामंत असल्याची खात्री दिली. त्यानंतर रात्री जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भावना गवळी यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी निश्चित झाल्याची वार्ता पसरली. मात्र, उशिरापर्यंत ही घोषणा अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे पक्षाकडून तीन, चार नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतिम दावेदार कोण असेल हे मात्र गुलदस्त्यात आहे. भावना गवळी मुंबईत ठाण मांडून असताना, मुख्यमंत्र्यांकडून संभाव्य नावाच्या घोषणेची खात्री झाल्यामुळेच पालकमंत्री संजय राठोड निश्चिंत होवून मुंबईहून यवतमाळात परतल्याचेही सांगण्यात येते. यवतमाळात परत येताच संजय राठोड यांनी मंगळवारी आर्णी तालुक्यातील लोणी, महागाव परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणीसुद्धा केली. लोणी हे माजी खासदार दिवंगत उत्तमराव पाटील यांचे गाव आहे.

हेही वाचा >>> जोरगेवार, पुगलिया, ॲड. चटप  व ॲड.गोस्वामी यांचे पाठबळ कुणाला? भूमिकेकडे मतदारांचे लक्ष

महायुतीकडून उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नावावरही उमेदवारीबाबत चर्चा झाली, हे विशेष. मनीष पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये आहे. परंतु, भाजपच्या ‘इलेक्टिव मेरिट’ धोरणामुळे त्यांच्याही नावाचा महायुतीने विचार केल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे समर्थकही आपल्या नेत्यालाच संधी मिळेल, असे खात्रीने सांगत असल्याचे चित्र दिवसभर होते. शिवसेनेच्या एकमेव खासदार म्हणून पाच वेळा केलेले प्रतिनिधीत्व आणि ‘राजयोग’ ही भावना गवळींची भक्कम बाजू असल्याचा दाखला त्यांचे समर्थक देतात. तर संजय राठोड यांच्याकडे संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फळी व समाजाच्या मतांचे कॅडर ही महत्वाची बाजू असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यामुळे आजही शिवसेना शिंदे गटात, संभाव्य उमेदवार भाऊंचा, की ताईच उमेदवार राहणार या मुद्यावरून अस्वस्थता बघायला मिळाली.