लोकसत्ता टीम

चंद्रपूर : राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणजे, आमच्या बाजूचा म्हणजे विरोधकांचा मुख्यमंत्री असतो. विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार धाडसी आहेत, त्यांना सर्वांना घेऊन चालण्याची कला अवगत आहे या शब्दात, खासदार प्रणिती शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ४५ कोटी रुपये खर्चून अड्याळ (जानी) येथे आयोजित विपश्यना केंद्राच्या भूमिपूजन व तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

African Giant Snail which is causing havoc all over the world was found in Brahmapuri
जगभरात तांडव माजवणारी ‘ती’ ब्रम्हपुरीत आढळली…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
sharad pawar ajit pawar (3)
Sharad Pawar Speaks on Ajit Pawar: अजित पवार बारामतीमधून इच्छुक नाहीत, शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”त्यांच्या मनात…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”

मुख्य अतिथी म्हणून थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ. फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा. फ्रामाहा सुपाचै सुयानो, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणीती शिंदे, खासदार बलवंत वानखेडे, खासदार डॉ. नामदेव किरसान, कॅप्टन नटिकेट थायलंड, सिनेअभिनेता गगन मलिक, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, ॲड राम मेश्राम, माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजुरकर मंचावर उपस्थित होते.

आणखी वाचा-नागपुरात वादळी पाऊस, काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली

याप्रसंगी भाषणात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचे जाहीर कौतुक केले. विरोधी पक्षनेता म्हणजे या बाजूचा मुख्यमंत्री असतो. त्यांना मुख्यमंत्र्यानंतर मान असतो असे सूचक भाष्य केले. विजय वडेट्टीवार धाडसी आहेत, सर्वांना घेऊन चालतात असेही खासदार शिंदे म्हणाल्या.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी मानव जातीला जीवनाचा अर्थ समजावून प्रत्येक सजीवाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना निर्माण करणारी प्रेरणा दिली, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक माणसाला समान हक्काने जगण्यासाठी संविधान दिले. या संविधानामुळेच मी आज सर्वसामान्य ते राज्याचा विरोधी पक्षनेते म्हणून जाणतेची सेवा करीत असून जन्माने जरी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो.

आणखी वाचा-चंद्रपूर : जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाचा गुराख्यावर हल्ला…

तथागतांच्या धम्मातील माणुसकीची व प्रेमभावाची शिकवण हीच जगाला शांतीचा संदेश देणारी खरी शिकवण होय, असे सांगितले. हे विपश्यना केंद्र सर्व धर्म पंथातील नागरिकांसाठी मानवतावादी उच्चविचारांचे अधिष्ठान म्हणून येणाऱ्या काळात नावलौकिकास येणार असून ही सत्कार्य करण्याची संधी मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्राप्त झाली. बाबासाहेबांचे संविधान हे सर्वसामान्य माणसाचे कवच असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. भविष्यात येथे जागतिक स्तरावरील धम्म परिषद घेता येईल, अशा सर्व सुविधांसह प्रशस्त अशी व्यवस्था करून देण्याची मी ग्वाही देतो, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

अड्याळ येथील विपश्यना केंद्र हे देशभरात नावलौकिक ठरेल, असे खासदार शिंदे म्हणाल्या. यावेळी हत्तीअंबीरे, खासदार वानखेडे, खासदार किरसान, शिवानी वडेट्टीवार यांनीही मार्गदर्शन केले. सिनेअभिनेते गगन मलिक यांनी बौद्ध धर्माच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले, तर भंतेजी डॉ. फ्रामहा सुपाचै धम्मभणी यांनी उपस्थितांच्या जीवनात सुखसमृद्धीसाठी तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना केली.