बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व चिन्हाबद्धल दिलेला निकाल अभ्यासपूर्ण असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. मुळात ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेतले, त्यांचे महत्व व ताकद ओळखण्यात घोडचूक केली. यामुळे आज त्यांच्यावर हे लाचारीचे दिवस आल्याची खरपूस टीका सेना नेते तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. खा. संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> नागपूर : २०२४ च्या निवडणुकीसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा…म्हणाले पुढच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी…
शहर सार्वजनिक शिवजयंतीच्या मुख्य सोहळ्याला आज रविवारी हजेरी लावल्यावर नजीकच असलेल्या आपल्या संपर्क कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. धनुष्य बाणाची ‘ गिफ्ट’ मिळाल्यावर खासदार अधिकच आक्रमक झाल्याचे या चर्चेतून दिसून आले. मुळात ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची ताकद समजली नाही. त्यांना वाटले की फार झाले तर दहा बारा आमदार त्यांच्या समवेत जातील, तसे झाले तर त्यांना अपात्र ठरवून टाकू, अशा गैरसमजामध्ये ते राहिले. त्यामुळे त्यांच्यावर आजचे वाईट दिवस आले. शिंदे हे मुख्यमंत्री पदी असणे, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी सहाच महिन्यात घेतलेले धडाकेबाज निर्णय, हे ठाकरे कंपूला सहन होत नसल्याने त्यांनी त्यांच्यावर गलिच्छ टीका करणे सुरू केले आहे. या वात्रटपणामुळेच आज ते खाली आले असल्याचे खासदार यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सहायकाच्या कार्यालयासाठी ९.४० लाखाचे एसी, निविदा वादात
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विचारले असता, त्यांनी हा निर्णय अभ्यासपूर्वक देण्यात आल्याचे ठामपणे सांगितले. या निकालाचे सविस्तर वाचन केले तर हे स्पष्ट होते. या निकालावर संजय राऊत यांचे भाष्य हास्यास्पद असल्याचे खासदार जाधव म्हणाले. निकालाच्या दिवशी दुपारपर्यंत आमचा न्यायव्यवस्था वर विश्वास असल्याचे सांगणाऱ्या राऊत यांनी निकाल आल्यावर वेगळीच भाषा वापरली. त्यामुळे राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावं की, ते सकाळी खरं बोलत होते की, संध्याकाळी खोटे बोलत होते? राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन चाटूगिरी करण्याकरता ठेवले आहे. राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. आता त्यांनी खासदारांना १०० कोटी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, राऊत यांचे गणित कच्चे आहे असे सांगून, एक खासदार हा सहा आमदारांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे राऊत यांनी आमच्यावर ३०० खोक्यांचा आरोप केला पाहिजे, अशी खिल्ली त्यांनी उडविली. ‘शिवसेना भवन व शाखा खाजगी मालमत्ता नाही’ अन्य प्रश्नाच्या उत्तरात खासदार म्हणाले की, शिवसेना भवन व शाखा कुुणाची खासगी मालमत्ता नाही, ती शिवसेनेचीच असल्याचा दावा जाधव यांनी केला.