धार्मिक श्रद्धा ठेवून अनेक भक्त विशिष्ट मंदिरात पूजाअर्चा करीत असतात.नवस पण ठेवतात.मनोकामना पूर्ण झाली की देव पावला म्हणून कृतकृत्य होतात.अशीच ख्याती देवळी तालुक्यातील एकपाळा  हनुमान मंदिराची पंचक्रोशीत पसरली आहे. स्थानिक पुढारी या हनुमानाची पूजा करीत कार्य सुरू करतात.त्यात खासदार रामदास तडस पासून परिसरातले अनेक मान्यवर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी गरजेच्या तुलनेत निम्मीच जागा! ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागातील स्थिती

राज्य शासनाने पण भक्तांच्या मागणीनुसार तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात या मंदिरास मोठा निधी दिला आहे.त्यात परत खासदार निधीची भर पडल्याने पाकशाळा व अन्य बांधकामे मार्गी लागली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार तडस यांनी इथे हजेरी लावत भावना व्यक्त केल्या.स्वतः शक्तीचे उपासक व नामवंत मल्ल राहलेले तडस म्हणाले की मी वयाच्या दहाव्या वर्षापासून या हनुमानाच्या दर्शनास येत आहे.त्यांच्या आशीर्वाद घेतल्या शिवाय कोणत्याही मोठ्या कामाची सुरवात करीत नाही. या हनुमानजीच्या आशीर्वादानेच मी आज खासदार आहे.त्यामुळे या मंदिराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खासदारांनी दिली.फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना विविध भेटवस्तुचे वाटप करीत त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश करोटकर, सचिव शरद आदमने, राजेश बकाने, दशरथ भूजाडे व अन्य यावेळी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp ramdas tadas expressed feelings after visiting hanuman temple pmd 64 zws