वर्धा: कोविड-१९ महामारी अगोदर विविध मेल/एक्सप्रेस गाडयांचे थांबे सिंदी रेल्वे, तुळजापूर, सेवाग्राम, हिंगणघाट, वर्धा, पुलगांव, धामणगांव, चांदूर, वरुड (ऑंरेज सिटी), मोर्शी या रेल्वे स्थानकावर सुरु होते, परंतु कोविड-19 महामारी मुळे सर्व थांबे रद्द करण्यात आलेले होते. रद्द झालेले थांबे पुर्ववत करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते. काही रेल्वे गाडयाचे थांबे सुरु झालेले आहे, परंतु अद्यापही काही रेल्वेस्थानकावरील थांबे प्रलंबित आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणा-या सुविधा सुरु झालेल्या नाही. वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रवासी संघटना, विविध ठिकाणचे प्रवासीवर्ग व नागरिक यांनी रेल्वे थांबे, तसेच विविध समस्या संबधीत खासदार रामदास तडस यांना अवगत केले. प्रवासी वर्ग व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी रेल्वे विविध विषया संबधीत मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

वर्धा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये एकूण तेरा मोठी रेल्वे स्थानके आहेत. या रेल्वेस्थानकावरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोविडपूर्वी अनेक गाड्यांचा थांबा सुरळीत सुरु होता, परंतु कोविडमुळे संपुर्ण भारतातील सर्व रेल्वेस्थानकावरील रेल्वे थांबे बंद करण्यात आले होते, त्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व थांबे रद्द झालेले होते, परंतु २०२२ मध्ये रेल्वे सुरळीत सुरु झाल्यानंतर कोविडच्या पुर्वी असणारे वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक रेल्वे गाडयांचे थांबे अद्यापही प्रलंबित आहे. कोविडपूर्वी सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणा-या सर्व गाड्या पुर्ववत करावे. तसेच वर्धा ते पुणे दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी. हावडाहून पुण्याकडे जाणा-या दुरोंतो एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा मंजूर करावा. कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणा-या रेल्वे सुविधा स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या जेष्ठ नागरिकांच्या सुविधा त्वरित प्रभावाने पुन्हा लागू करण्याची विनंती केली.

anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
Rahul Gandhi caste
Rahul Gandhi : “राहुल गांधी हे मुस्लीम आहेत की ख्रिश्चन हे त्यांनाही माहिती नाही”, कर्नाटकमधील भाजपा आमदाराचं विधान!
Congress question about what was the location of Sanket Bawankule between 12.30 to 1 am
नागपूर ‘हिट अँड रन’ : रात्री १२.३० ते १ या वेळेत संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? काँग्रेसचा सवाल
bmc officials busy with ministers meetings ahead of assembly elections
पालिकेचे अधिकारी बैठकीतच व्यस्त; निवडणूकीच्या तोंडावर मंत्र्यांच्या बैठकांचा सपाटा
bjp mla Devyani pharande marathi news
नाशिक: खड्ड्यांसह नागरी समस्यांविषयी भाजप आमदारांचा मनपा आयुक्तांना इशारा
Nagpur, narendra modi, vadhvan port grounbreaking, nana patole criticises pm narendra modi,
स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका

हेही वाचा… विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’

कोविड-19 महामारीनंतर अनेक रेल्वे सेवा पुर्ववत सुरळीत सुरु झाल्या आहेत, परंतु वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक रेल्वेस्थानकावरील रेल्वे थांबे प्रलंबित आहे, तसेच पुणे येथे विदर्भातील जाणारी संख्या जास्त आहे, यासाठी वर्धा ते पुणे दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणे आवश्यक आहे, हावडा येथून पुणे येथे जाणा-या दुरोंतो एक्सप्रेसला नागपूर नंतर स्टॉपेज नसल्यामुळे पुणे येथे जाण्यासाठी एक पर्याय म्हणनू वर्धा येथे थांबा मिळणे आवश्यक आहे, यासाठी हावडाहून पुण्याकडे जाणा-या दुरोंतो एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा मंजूर व्हावा व जेष्ठ नागरिकांना सुविधा मिळणा-या सुविधा पुर्ववत सुरु व्हावे या दृष्टीकोनातुन आज लोकसभेमध्ये रेल्वे संबधीत मुद्दे उपस्थित केले असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.