वर्धा: कोविड-१९ महामारी अगोदर विविध मेल/एक्सप्रेस गाडयांचे थांबे सिंदी रेल्वे, तुळजापूर, सेवाग्राम, हिंगणघाट, वर्धा, पुलगांव, धामणगांव, चांदूर, वरुड (ऑंरेज सिटी), मोर्शी या रेल्वे स्थानकावर सुरु होते, परंतु कोविड-19 महामारी मुळे सर्व थांबे रद्द करण्यात आलेले होते. रद्द झालेले थांबे पुर्ववत करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते. काही रेल्वे गाडयाचे थांबे सुरु झालेले आहे, परंतु अद्यापही काही रेल्वेस्थानकावरील थांबे प्रलंबित आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणा-या सुविधा सुरु झालेल्या नाही. वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रवासी संघटना, विविध ठिकाणचे प्रवासीवर्ग व नागरिक यांनी रेल्वे थांबे, तसेच विविध समस्या संबधीत खासदार रामदास तडस यांना अवगत केले. प्रवासी वर्ग व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी रेल्वे विविध विषया संबधीत मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा