भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दररोज सकाळी एक भोंगा वाजतो व खालच्या पातळीवरची भाषा बोलतो. त्यामुळे ‘आपला दवाखाना’मध्ये त्यांच्यावरच सर्वांत आधी उपचार केले जातील, अशी टीका खा. शिंदे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात २६४ कोटी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनासाठी खासदार श्रीकांत शिंदे आज, मंगळवारी आले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी राऊतांवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम विरोधकांच्या पचनी पडत नसून त्यांच्या पोटात सतत दुखत असते. त्यामुळे आम्ही जे ७०० ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत, त्यापैकी कुठल्याही एका दवाखान्यात त्यांना उपचार घेता येतील. जेणेकरून रोज सकाळचा भोंगा बंद होईल आणि राज्यातील लोकांना शांती लाभेल, असे खा. शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> नागपूर : शास्त्रज्ञांच्या सूचनांकडे केलेलं दुर्लक्ष चित्त्यांच्या मुळावर; ‘साशा’, ‘उदय’नंतर आता दक्षाचा मृत्यू

कर्नाटकमधील निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना कोण ओळखतो, या अजित पवार यांच्या विधानावर  प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही १० महिन्यात साडेबारा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना दिले आहे. लोकांची कामे करत आहोत. त्यामुळे संपूर्ण देश शिंदे-फडणवीस यांना ओळखत असल्यानेच दादांच्या पोटात दुखत आहे.

 “अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात गेले, हा तर…”

मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर खा. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ना. सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. असे झाले असल्यास ती राज्यासाठी मोठी दुर्दैवाची बाब आहे. गेल्या अडीच वर्षात मंत्रालय पूर्णपणे बंद होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले, हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.