नागपूर : मागील काही महिन्यांपासून एमपीएससीच्या निकालाला गती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल दोन महिन्यांत आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चंद्रपूर: इरई, झरपट नदीच्या सौंदर्यीकरणासाठी हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश…

हेही वाचा – भारतात नामबदलाची परंपरा जुनीच, यापूर्वी राज्य आणि राजधान्यांचेही नामकरण

सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकीच मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. मुख्य परीक्षेसंदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc announced the results of the major exam within two months dag 87 ssb
Show comments