नागपूर : स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्यरितीने करता यावी, परीक्षांचा अंदाज यावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानुसार ‘एमपीएससी’तर्फे १६ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. यात राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बहूतांश परीक्षांचे निकाल, मुख्य परीक्षा अद्यापही झालेल्या नसल्याने २०२५चे संभाव्य वेळापत्रक म्हणजे गाजर दाखवण्याचा प्रकार ठरणार आहे.

हेही वाचा…राज्यभरात मतटक्का वाढला… पण, ६२ मतदारसंघात तृतीयपंथींनी….

‘एमपीएससी’कडून मागील काही वर्षांपासून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून येते. २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. २०२४ या वर्षातील अनेक पूर्व परीक्षा आणि काही परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे. आयोगाकडून २०२५ चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर आयोगाने शुक्रवारी वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये १६ परीक्षांचा समावेश असून यात संयुक्त आणि राज्यसेवा परीक्षेचा समावेश आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. यात ९ राजपत्रित सेवांचा समावेश राहणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे होणार आहे.

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार विजयी होणार? निकालापूर्वीच चंद्रपुरात…

२०२४ च्या परीक्षाच वर्षभर चालणार

२०२४ मध्ये जाहीर झालेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि परीक्षाही लांबल्या आहेत. ‘एमपीएससी’च्या दिरंगाईमुळे २०२४ मध्ये जाहीर झालेल्या बहूतांश परीक्षा मे २०२५ पर्यंत चालणार आहेत. तर काही परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासही २०२५ उजाळणार आहे. यात राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, वनसेवा आदींचा समावेश आहे. त्यामुळे आयोगाकडून २०२४चे वेळपत्रकाचे पालन झालेले नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा…थेट अमित शहांकडून पुर्नवसनाचा शब्द मिळूनही माजी आमदाराचा सन्यास…म्हणाले, काय भरवसा?…

मुख्य परीक्षा वर्णनात्मक

स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार आता २०२५पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल, ही बाब स्पष्ट झाली आहे. नवीन पद्धतीने परीक्षा राहणार असल्याची अभ्यासाच्या पद्धतीमध्येही बदल होणार आहे.