नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी गट- अ व ब या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये समाजकार्याच्या पदवीधारकांनाच डावलण्यात आले होते. याला राज्यभरातील विद्यार्थी आणि संघटनांच्या विरोधातनंतर ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक जाहीर करत गट-अ साठी आता केवळ समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त व तत्सम ‘गट-अ’साठी ४१ आणि समाज कल्याण अधिकारी ‘गट-ब’च्या २२ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र, ‘गट-ब’साठी अर्ज करताना सर्व पदवीधर पात्र ठरवण्यात आले होते. मात्र, समाजकार्याची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करणे शक्य नव्हते. मात्र, आता आयोगाने यात सुधारणा करून सर्व पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. याशिवाय ‘गट-अ’साठी इतर पदवीधरांनाही अर्ज करता येत होता. याला समाजकार्य पदवीधरांकडून विरोध केला जात होता.

हेही वाचा – नागपूर : ट्रकच्या धडकेत जावाई-सासरे ठार

समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाजकार्य विकास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकल्याण प्रशासन, सामाजिक संशोधन, समूदाय संघटक, व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य तसेच समाजात प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिकांचे कार्य पूर्ण करावे लागते. त्यामुळे केवळ समाजकार्य पदवीधारकांनाच ‘गट-अ’ पदासाठी अर्ज करता यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. आयोगाने यासंदर्भातील शुद्धीपत्रक जाहीर करून कुठलाही पदवीधर ‘गट-अ’साठी अर्ज करू शकत असला तरी त्याच्याकडे समाजकार्याची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक राहणार आहे.

Story img Loader