नागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२३ ला प्रकाशित केली होती. मात्र, मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर आयोगातर्फे १ डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी दोन पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात. त्यापैकी पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर आहे. अधिकारी म्हणून काम करताना उमेदवार कोणत्या पद्धतीने विचार करुन निर्णय घेऊ शकतो हे तपासणारा घटक म्हणजे निर्णय क्षमता व व्यवस्थापन कौशल्ये होय. पण यंदा झालेल्या परीक्षेत काही असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी; पाच वर्षात ३०२

ज्यामुळे भावी अधिकाऱ्यांना नेमकी कोणती निर्णयक्षमता हवी आहे? असा प्रश्न उभा राहतो. यामुळे परीक्षेवर अनेक चर्चा झाल्या. या परीक्षेची उत्तरतालीका आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. तसेच आयोगाने अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली आहे. आयोगाने प्रश्नपत्रिका एक व प्रश्नपत्रिका दोन संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्याच्या उत्तरतालिकाही देण्यात आल्या आहेत.

अनेकदा परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरतालिकेवर जर काही हरकती असल्यास त्यांना त्या १० डिसेंबरपर्यंत नोंदवता येणार आहे. यासाठी आयोगाने यापूर्वी नियमावली दिली होती. त्याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवाव्या असेही कळवण्यात आले आहे. उत्तरतालिका जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत किती गुण मिळण्याची शक्यता याचा अंदाज येतो. त्यामुळे परीक्षा झाल्यावर विद्यार्थी उत्तरतालिकेची वाट बघत असतात. यावेळी आयोगाने वेळेत उत्तरतालिका जाहीर केली आहे.

उत्तरतालिकेवरून झाला होता वाद

यापूर्वी उत्तरतालिकेवरुन अनेकदा वाद निर्माण झाला होता. काही चुकीच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आयोगावर अनेक आरोप केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तरतालिकेमध्ये बदल करण्याची मागणीही केली होती. तर काही उमेदवार न्यायालयातही गेले होते. त्यामुळे यावेळी तसा वाद निर्माण होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा >>>गोंदिया : प्रफुल्ल पटेलांच्या गृहजिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार?

२५ ऑगस्टची परीक्षा रद्द झाली होती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षण पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर एक डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc answer key announced news regarding preliminary exam 2024 nagpur news dag 87 amy