नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ – लेखी परिक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातून कोमल देवराव बेलदार ही पहिली आली असून योगीता ओमप्रकाश भरडे ही दुसरी आली आहे.
विद्यार्थी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ – लेखी परिक्षेचा निकालाची वाट बघत होते. अखेर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-२०२३ चा निकाल १४ मे २०२४ रोजी आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता.
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेसाठी विहित मुदतीत विहित शुल्कासह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात आला. तपासणीअंती अपात्र ठरणाऱ्याया उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, अशा सूचना आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमुद केल्या होत्या.
उमेदवाराने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, त्यात परीक्षा केंद्र नमूद करणे व परीक्षा शुल्क विहित मुदतीत भरणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ – लेखी परिक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
यामध्ये कोमल देवराव बेलदार ही विद्यार्थिनी पहिली आली असून योगीता ओमप्रकाश भरडे दुसरी आली आहे. प्रस्तुत परीक्षेचा निकाल उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.