वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब व गट क परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.चार महिन्यानंतर हा निकाल जाहीर झाला.मात्र हा निकाल जाहीर करतांना सुखद धक्काही दिला.या विविध गटातील ८ हजार १६९ पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० पैकी एक किंवा सर्व पोट विभागाचा पर्याय देवू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण यामुळे मुख्य परीक्षेसाठी लागणारा कट ऑफ वाढेल व हजारो विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा देण्याची संधी सुटेल, अशी भीती व्यक्त होत होती.विद्यार्थी संघटना, काही आमदार असे बोलत होते.या अनुषंगाने एकच कट ऑफ लावण्याची मागणी होती.ती मान्य झाली आहे.त्यामुळे ९५ हजार ५४७ विद्यार्थ्यांना पात्र ठरविले आहे.जवळपास दहा हजारावर अधिक पात्र ठरले.यापूर्वीचा कट ऑफ चाळीसच्या पुढे होता.आता १९ गुणांखाली आला आहे.त्यामुळे बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहे.ही आनंदाची बाब म्हटल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc clerk and typist exam result declared pmd 64 amy