नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक १५ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रतीक आगवणे हे राज्यातून व अनुसूचित जाती वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील अक्षता दत्तात्रय मांजरे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
हेही वाचा – नागपूर : शाळकरी मुलगी चार महिन्यांची गर्भवती; सत्य समजताच आईच्या पायाखालची जमीन सरकली
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कट ऑफ मार्क) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे.
उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्द्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा – गोंदिया : ३० जूनपूर्वी शाळा सुरू केल्यास कारवाई, खासगी शाळांना शिक्षण विभागाची ताकीद
सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर दिव्यांग/ अनाथ /खेळाडू / मागास उमेदवारांची शिफारस विहित प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.