अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजारांचे आर्थिक सहाय्य मिळेल. त्यासाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (गट-अ व गट-ब), विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब), निरीक्षक, वैधमापनशास्त्र (गट-ब) आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब) मुख्य परीक्षा २०२३ साठी अनुसूचित जातीच्या उमेदवार पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. त्याचा १५ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापनशास्त्र आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा निकालाच्या यादीमध्ये समावेश असणे बंधनकारक आहे.