नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २५ डिसेंबर रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ व सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली. २५ डिसेंबर रोजी नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असतानाही परीक्षा घेण्यात येत असल्याने काही उमेदवारांनी नाराजीचा व्यक्त केली होती. परंतु अखेर ही परीक्षा घेण्यात आली असून यांची उत्तरतालिक जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण) व जा.क्र.१३२/२०२३ सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. हरकती सादर करण्याकरीता ६ जानेवारी २०२५ पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
upsc preparation loksatta
UPSCची तयारी : ‘यूपीएससी’ची बाराखडी
Sachindra Pratap Singh Adhikari appointed as maharashtra State Education Commissioner
राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
bhuldhana district Abuse of minor girl,
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम पोलिसांना शरण…
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा

हे ही वाचा… अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम पोलिसांना शरण…

यामुळे झाला होता वाद

‘एमपीएससी’च्या वतीने विविध परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या परीक्षांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. ‘एमपीएससी’च्या बहुतांश परीक्षा या रविवारी होतात. नाताळ हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते तरीही या दिवशी आयोगाने परीक्षा ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. समाज कल्याण विभागातील दोन्ही संवर्गासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती नागपूर या केंद्रांवर घेण्यात आली. त्यामुळे नाताळ सणाच्या दिवशी होणारी परीक्षा आयोगाने दुसऱ्या तारखेला घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सर्व धर्माचा आदर करणे हे आयोगाचे काम आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिचन धर्माचा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. मात्र, याच दिवशी समाज कल्याणचा पेपर असल्याने या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. यावर तोडगा काढावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र आयोगाने अखेर परीक्षा घेतली. या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकतात. हरकती सादर करण्याकरीता ६ जानेवारी २०२५ पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी एमपीएससीने तयार करून दिलेल्या तक्त्यातच अर्ज करावा अश्या सूचना दिल्या आहेत.

Story img Loader