नागपूर : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही उत्तरतालिका पाहून आपल्या निकालाचा अंदाज बांधता येणार आहे.
आश्चर्य म्हणजे, या उत्तरतालिकेमध्ये आयोगाने पुन्हा एकदा चुकीचे प्रश्नोत्तरे दिल्याची उमेदवारांची ओरड सुरू झाली आहे. यात दोन प्रश्न चूक असून तीन प्रश्न रद्द करावे लागणार, अशी मागणी आहे. एमपीएससीच्या वतीने मागील काही वर्षांत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये चुकांचे प्रमाण वाढले आहे. शून्य चुका ही संकल्पना राहिलीच नाही असे चित्र आहे.
हेही वाचा – भाजपाची वाशीम जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर
३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ही परीक्षा घेण्यात आली. त्याच्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही चुका कायम असल्याची उमेदवारांची ओरड आहे. दोन प्रश्न रद्द तर चार प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत. त्यामुळे आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.