नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ४ जून रोजी रविवारी होत आहे. नागपूर येथील ३२ उपकेंद्रावर सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच या दोन सत्रात ११ हजार १४६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी प्रशासन तयारीला लागले असून ३२ उपकेंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

Story img Loader