नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख १ मार्च २०२४ आहे. शेवटची तारीख २१ मार्च २०२४ आहे. सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ अशा ३९ पदांसाठी जाहिरात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभर मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशीही ओरड होत आहे. यातच पुन्हा अनुसूचित जाती, जमातीचे हक्काचे आरक्षण नाकारले जात असल्याचा आरोप होत होता. एमपीएससीकडून जाहिरात क्रं. ११४/२०२३ अन्वये सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक गट-अ करिता २१४ पदांच्या भरती संदर्भात जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीत पात्रतेकरिता पदव्युत्तर शिक्षण ५५ टक्के अशी अर्हता होती. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग तसेच दिव्यांगांना देण्यात येणारी ५ टक्के सवलत संदर्भात कोणतीही सूचना नव्हती. आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांना ५ टक्के सवलत म्हणजे ५० टक्के गुणांची मर्यादा दिली जाते. मात्र, आयोगाकडून कुठलेही स्पष्टीकरण न देता सरळ आरक्षणाचा नियमच डावलण्यात आल्याने आरक्षित घटकातील उमेदवारांना ऑनलाईन अर्जास मुकावे लागले होते. लोकसत्ताने हा विषय लावून धरल्यावर ५ टक्के आरक्षणाची सवलत लागू केली. जाहिरातीनुसार प्राध्यापक पदासाठी –

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४५ वर्षे असावे
परीक्षा शुल्क : अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन

हेही वाचा : आघाडीत बुलढाणा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०१मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मार्च २०२४
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc recruitment for 39 posts exam applications starts from 1 st march 2024 dag 87 css
Show comments