नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) ८ हजार १६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक पदाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले पंधरा हजारांवर उमेदवार अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी टंकलेखन कौशल्य चाचणी झाली होती. यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आल्याने गुणवत्ता यादी रखडल्याचे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी दोन वर्षांपासून परीक्षा, निवड यादी आणि त्यानंतर नियुक्तीच्या अपेक्षेत असणाऱ्या तब्बल पंधरा हजारांवर उमेदवारांची चिंता वाढली आहे.

class 12th exams started today with 5322 students from 7 centers in Shirur appearing
शिरुर तालुक्यातून इयत्ता १२ वीच्या परीक्षेस ५३२२ विद्यार्थी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra ssc board examination
कर्मचाऱ्यांची अदलाबदल, ड्रोनची देखरेख… कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाचे महत्वपूर्ण निर्णय!
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam : ‘एमपीएससी’ची ४० लाखांत प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार

हेही वाचा >>>अकोला : सावधान! ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटी थकीत, फौजदारी कारवाई…

‘एमपीएससी’ने जानेवारी २०२३ मध्ये संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षांच्या एकूण ८१६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यात लिपिक टंकलेखक पदाची जवळपास ७००७ आणि कर सहायकची ४६८ पदे होती. यासाठी ३० एप्रिल २०२३ राेजी पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ ला पार पडली. यानंतर लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान घेण्यात आली. यातील उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली. सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मात्र, दोन वर्षांपासून उमेदवार परीक्षा देत असून नोकरी मिळवण्याच्या आशेवर असताना इतका विलंब होत असल्याने चिंता वाढली आहे. आठ हजारांवर पदांसाठी ही भरती प्रक्रिया असल्याने जवळपास पंधरा हजरांवर उमेदवार गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत असून आयोगाने यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा >>>गोंदिया : प्रफुल्ल पटेलांच्या गृहजिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार?

तारीख वाढवून घेत असल्याचा आरोप

न्यायालयामध्ये आयोगाकडून वारंवार तारीख वाढवून घेतली जात असल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. न्यायालयात १४ ऑक्टोबरला सुनावणी झाली, परंतु आयोगाने पुन्हा तारीख वाढवून घेतली आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला देखील सुनावणी झाली, परंतु परत १३ नोव्हेंबर आणि त्यानंतर आता ९ डिसेंबरची तारीख वाढवून मागितल्याचा उमेदवारांचा आरोप आहे.

‘एमपीएससी’चे म्हणणे काय?

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चिंतेची आयोगाला पूर्ण जाणीव आहे. परंतु, न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित आहे. वारंवार तारीख वाढवून घेण्याचा मुद्दाच येत नाही. न्यायालयात आयोगाने उत्तर सादर केले आहे. न्यायालयात लवकर तोडगा निघावा म्हणून विशेष अधिवक्त्यांची नियुक्ती केल्याची माहिती ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.

Story img Loader