नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) वतीने घेण्यात येणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा व आयबीपीएस आरआरबीआय परीक्षा आणि राज्यसेवा व आयबीपीएस लिपीक बँक ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही ‘एमपीएससी’ने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ही परीक्षा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील आयबीपीएस लिपीक परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे १८ ऑगस्ट रोजी ‘एमपीएससी’कडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पण त्याच दिवशी आयबपीएस आरबीआय परीक्षाही नियोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, २५ ऑगस्टला कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित होती. मात्र, त्यांनी याच दिवशी आयबीपीएस लिपीक परीक्षा असल्याने ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘एपीएससी’नेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्या अशी मागणी होत आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

हेही वाचा : नागपूर: आजारांच्या साथी, मात्र शासकीय डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर; खासगी डॉक्टरही…

परीक्षेसंदर्भात दोन मतप्रवाह

मराठा आरक्षणावरून ‘एमपीएससी’ने राज्यसेवा पूर्व परीक्षा आधीच दोनदा पुढे ढकलली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काही राजकीय पुढाकाऱ्यांकडूनही समाज माध्यमांवर तशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे ‘आयबीपीएस’मध्ये मोचकेचे परीक्षार्थी असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी ‘एमपीएससी’ची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे परीक्षेसंदर्भात दोन मतप्रवाह आहेत.

कर्नाटकने परीक्षा पुढे ढकलली

विशेष म्हणजे, २५ ऑगस्ट रोजीच कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित होती. पण त्याच दिवशी आयबीपीएस लिपीक परीक्षा असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : Video: स्टंटबाजी भोवली! तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती; एक बुडाला, दोघे बचावले

आयोगाचे म्हणणे काय?

‘आयबीपीएस’ला यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या हीत यालाच प्राधान्य आहे.

डॉ. सुवर्णा खरात, सचिव एमपीएससी.