नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहेत. आयोगाने निकालाच्या प्रक्रियेला गती आणली आहे. याचाच परिणाम की एमपीएससीने डिसेंबर २०२२ मध्ये घेतलेल्या निम्न श्रेणी लघुलेखक गट- ब चा निकाल जाहीर केला आहे. यासोबतच लघु टंकलेखक पदाचा निकालही जाहीर झाला आहे.
एमपीएससीच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये गट- ब च्या विविध पदांसाठी शैक्षणिक अहर्तेच्या आधारे चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातील हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची अनेक दिवसांपासून वाट होती. अखेर आयोगाने निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे.