गडचिरोली : वीज मीटर सदोष असल्याचे सांगून आकारलेला दंड कमी करण्यासाठी एका ग्राहकाकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी आलापल्ली येथील महावितरणचा उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यास अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या ग्राहकाचे घरगुती वीज मीटर फॉल्टी असल्याने २ लाख २० हजार रुपये दंड भरावा लागेल, असे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर याने सांगितले.

हेही वाचा >>> बुलढाणा : २३५९ ग्रामपंचायतींच्या नामांकन वेळेत वाढ, निवडणूक आयोगाचे आदेश

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

पुढे दंडाची रक्कम कमी करुन ती ७३ हजार ६९८ रुपये एवढी केली. मात्र, दंड कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर याने तक्रारकर्त्या ग्राहकास ४० हजारांची मागणी केली. पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने ग्राहकाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून विनोद भोयर यास ग्राहकाकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. याप्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्‌दीवार, हवालदार नत्थू धोटे, राजेश पद्मगिरवार, किशोर ठाकूर, संदीप उडाण यांनी ही कारवाई केली.