नागपूर : भारतात जेवढे वाईट होते, त्याहून ४० पट जास्त चांगले कामही होत आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपुरातील ‘स्नेहांचल’ वेदना उपशमन केंद्राला डॉ. भागवत यांनी गुरूवारी भेट दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर स्नेहांचलचे व्यवस्थापकीय विश्वस्थ जिम्मी राणा उपस्थित होते.

हेही वाचा… नागपूर : एनआयटीची स्मार्ट सिटीला नोटीस; कारण काय, वाचा…

हेही वाचा… गोंदिया जिल्हा कारागृह निर्मितीचे भिजत घोंगडे; हालचाली थंडावल्या, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मोहन भागवत पुढे म्हणाले, मनुष्याच्या आयुष्यात सेवा फार महत्वाची आहे. ज्याने सेवा केली त्याचे आयुष्य सार्थक झाले. भारतात जेवढे वाईट होते, त्याहून ४० पट चांगलेही होत आहे. स्नेहांचलचे काम लहान नसून खूप मोठे आहे. हे काम बघून ऊर्जा मिळते. सेवा कशी करावी, याचे हे आदर्श आहे. मी भारतभर फिरत असतो. यावेळी सेवा काम करणारे अनेकजण मिळतात. त्यांनाही स्नेहांचलच्या सेवभावबाबत माहिती देईल, असेही भागवत यांनी सांगितले.

Story img Loader