लोकसत्ता टीम

चंद्रपूर: केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. नीट परीक्षेतील घोळ, नेटचे पेपरफुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, सुभाषसिंग गौर, के. के. सिंग, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, घनश्याम मुलचंदानी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन अनुसूचित जाती, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी युवक काँग्रेस, कामगार आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा झटका! माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला ‘रामराम’

यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मागील १० वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास पाहिजे तसा झालेले नाही. उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केला. आमदार सुभाष धोटे यांनीही शासनावर कडाडून टीका केली. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागले. निट परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे, असेही धोटे म्हणाले.

आणखी वाचा-येत्या २४ तासात विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यातील पोलीस भरती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर मुडदे पाडले जात आहेत. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा,कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही, असा आरोप यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल फासण्यात आला. या आंदोलनात सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. तसेच सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.