वर्धा: येथील जिजाऊ स्मारकासाठी मराठा सेवा संघ व अन्य संघटना सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. धूनिवाले मठ परिसरात स्मारक उभारले. पण कबूल केल्याप्रमाणे जिजाऊ, शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी यांचे शिल्प लावण्यात आलेच नाही. केवळ प्रतिमा लावल्या. गत तीन वर्षापासून मागणी प्रलंबित राहल्याने संताप व्यक्त होत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेर निर्वाणीचा उपाय म्हणून पदाधिकारी उपोषणास बसले. हे माहीत झाल्यावर डॉ. मुधोजी राजे भोसले यांनी आंदोलनास भेट देत चर्चा केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना भेटून भावना कळविल्या. तेव्हा शिल्प लावण्याची मागणी मान्य करीत १० जुलै नंतर पुन्हा भेटण्याचे ठरले.

हेही वाचा… Buldhana Accident: वर्ध्यातील एकुण बारा प्रवाशांची आत्तापर्यंत ओळख पटली; सर्वत्र हळहळ

राजे मुधोजी यांनी प्रशासनाची भूमिका मांडत शिल्प न लागल्यास मी स्वतः उपोषणास बसणार, अशी खात्री दिली. हे समजून घेत उपोषणकर्ते अरुण जगताप, उमाकांत डुकरे, तुषार देव्हढे, राजेश वाकडे यांनी उपोषण सोडले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहीते यांच्याशी पण चर्चा झाली. आंदोलनास खासदार रामदास तडस, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख आदींनी भेट देत पाठिंबा दर्शविला होता.