नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने राज्यातील डॉक्टरांच्या कौशल्य विकासासाठी डिजिटल हेल्थ फाऊंडेशन अभ्यासक्रम (डीएचएफसी) सुरू केला आहे. आंतरवासिता विद्यार्थ्यांसाठी तो सक्तीचा असून कालांतराने परिचारिका, आयुषच्या विद्यार्थ्यांनाही सक्तीचा केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून ताे ऑनलाईन स्वरूपात नि:शुल्क उपलब्ध आहे. रोज दोन तासांचा वेळ दिला तर हा अभ्यासक्रम सुमारे आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्याला एक ऑनलाईन परीक्षाही देणे बंधनकारक आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संबंधित डॉक्टरांना दोन क्रेडिट पाॅईंट मिळतील. त्यासाठी आरोग्य विद्यापीठ महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी)ला पत्र देईल. त्यामुळे कुणालाही अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा देखावा करता येणार नाही, अशी माहिती कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी दिली.

हे ही वाचा… नागपूर : “संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी नाही, गुन्हाही दाखल नाही; देवेंद्र फडणवीसांनी आता…” सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

१३ प्रकारचे अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या डीएचएफसी अभ्यासक्रमात १३ प्रकारचे विभाग आहेत. त्यात नवजात शिशू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतरही विविध विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात डॉक्टरांना संबंधित विषयाच्या ज्ञानासह केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती, रुग्णाचा डेटा कसा संग्रहित करावा, संशोधनात्मक वापर याबाबतही शिक्षण दिले जाईल.

“डॉक्टरांचे कौशल्य विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रथम आंतरवासिता डॉक्टरांना तो सक्तीचा केला जाणार असून कालांतराने परिचारिका, आयुषच्या विद्यार्थ्यांसाठीही सक्तीचा केला जाईल. ”लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.

हे ही वाचा…गडचिरोली: पोलिसांची तत्परता, महिलेसाठी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवले …

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकबद्दल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८’ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. अभिमत विद्यापीठ वगळून राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, युनानी, होमिओपॅथी, परिचर्या महाविद्यालय, व्यवसायोपचार व भौतिकोपचार महाविद्यालये, बीपीएमटीसह निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आहे. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाकडून वैद्यकीयच्या अद्यावत शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम चालवण्यासह नावीन्यपूर्ण उपक्रमही राबवले जातात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muhs nashik launched digital health foundation course for skill development of doctors in state mnb 82 sud 02