दुचाकी, चारचाकी वाहनांची सोय

राम भाकरे
शहरात वाहनतळ नसल्याने निर्माण होणा-या समस्या सोडवण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तीन बहुतरीय वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. १५ कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शहरात वर्दळीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
नागपूर स्मार्ट ॲंड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला.

इतवारी परिसरातील धान्य बाजारात , सीताबर्डीतील सुपर मार्केट परिसरात आणि महाल भागातील गांधीसागर तलावाजवळ हे वाहनतळ असणार आहे. १५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले.प्रत्येक वाहनतळामध्ये.८० कार,५०० दुचाकी चाकी वाहने उभी राहतील अशी व्यवस्था असेल,अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.