नागपूर : सोशल मीडियाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयही स्वत: अपडेट करत आहे. या शृंखलेत उच्च न्यायालयाने टेलिग्रामवर स्वत:चा चॅनल सुरू केला आहे. ८ नोव्हेंबरला याबाबत न्यायालयीन प्रशासनाने परिपत्रक काढले. उच्च न्यायालयाच्या टेलिग्राम चॅनलवर रोजच्या कारवाईबाबत माहिती प्रसारित केली जाईल. याशिवाय ज्या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी होत आहे अशा प्रकरणांची लिंकदेखील यावर पुरविली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – यवतमाळ: दरोड्याच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक; आर्णी पोलिसांची कारवाई

हेही वाचा – गोंदिया : आश्रमशाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक, २१ पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य खंडपीठासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही चॅनलवर दिली जाईल. टेलिग्राम चॅनलवर डेटा सेव्ह करण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. टेलिग्राम चॅनलवरच सर्व अपडेट्स मिळत असल्याने उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याची गरज भासणार नाही, असे परिपत्रकात सांगितले गेले आहे. टेलिग्राम चॅनल सुरू केल्याबरोबर सुमारे दहा हजार लोकांनी चॅनलला फॉलो केले आहे.