नागपूर: झारखंडमधील राजखरसवा ते बडाबांबो रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे अपघात आल्याने नागपूरमार्गे हावडा, बिलासपूर, मुंबईकडे जणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेततर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबई ते हावडा, मुंबई ते अहमदाबाद, पुणे ते हावडा, एलटीटी मुंबई ते शालिमार दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या नागपूरमार्गे धावतात. या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने आणि काही गाड्या रद्द करण्यात आल्याने नागपूरहून बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

हावडा-मुंबई मेलचा मंगळवारी पहाटे ३.४३ वाजता अपघात झाला. एका मालगाडीचे २० डब्बे रुळावरुन घरसले आणि शेजारच्या रेल्वे मार्गावर पडले. हावडाहून मुंबईकडे निघालेली गाडी मालगाडीच्या घसरलेल्या गाडीवर आदळल्या. त्यामुळे त्या गाडीचे आठ डबे रुळावरून घसरले. या अपघात दोघांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिकजण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : कौशल्यविकासाच्या माध्यमातून वर्षाकाठी ६० हजारांचे उत्पन्न; गडचिरोलीच्या आदिवासी तरुणांची यशोगाथा…

हावडा- तितालगड-कांताबानजी एक्सप्रेस, खडगपूर-झारग्राम-धनाबाद एक्सप्रेस, हावडा- बारबील-हावडा जन शताब्दी एक्सप्रेस, टाटानगर-इतवारी एक्सप्रेस, शालिमार- एलटीटी एक्सप्रेस ३० जुलैला रद्द करण्यात आली. हावडा-यशवंतपूर विशेष गाडी १ ऑगस्टला, टाटानगर- एर्नाकुलम एक्सप्रेस ३१ जुलैला रद्द करण्यात आली. बिलासपूर- टाटानगर एक्सप्रेसल राऊलकेला येथे थांबण्यात आले. एर्नाकुलम-टाटानगर एक्सप्रेसला चक्रधरपूर येथे, हावडा-चक्रधरपूर एक्सप्रेसला अदरा येथे, इतवारी-टाटानगर एक्सप्रेसला बिलासपूर येथे थांबण्यात आले.

हेही वाचा : वाघ आला रे आला! त्या दोघांनी मोठ्या हिंमतीने वाघाला लावले पळवून अन्…

या गाड्यांच्या मार्गात बदल

हावडा-मंबई दुरान्तो एक्सप्रेसला खरगपूर-भाद्रक मार्गे वळण्यात आले आहेत. हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसलासिनी-कांद्रा-पुरुलिया-हटिया-नऊगाव-राऊरकेला मार्गे वळवण्यात आले आहे. हावडा-जगदलपूर एक्स्प्रेसला चांददील-मुरी- हटिया-राऊरकेला मार्गे, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसला चांददील-पुरुलिया-हटिया-राऊरकेला मार्गे, मुंबई-शालिमार एक्स्प्रेस, नऊगाव-कोटशीला-बोकारो स्टील सिटी-भोजुदीह-अदरा-मिदनापूर-खसगपूर मार्गे, हावडा-सीएसएमटी मुंबई गीतांजली एक्सप्रेसला टाटानगर-चांददील-पुरुलिया-कोटशिला-नऊगाव-राऊरकेला मार्गे, हावडा-सीएसएमटी मुंबई मेल या गाडीला खरगपूर-मिदनापूर-अदरा-भोजुदीह-बोकारो स्टील सिटी- कोटशिला- नऊगाव-राऊरकेला मार्गे आणि नांदेड- संत्रागाछी एक्स्प्रेसला नऊगाव-कोटशिला- बोकारो स्टील सिटी- भोजुदीह- अदरा-मिदनापूर- खरगपूर मार्गे सोडण्यात येत आहे. याशिवाय पुरी-योग नगरी ऋषिकेश एक्प्रेस, एलटीटी मुंबई- शालिमार एक्स्प्रेस, सीएसएमटी मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस, अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस, यशवंतपूर- टाटानगर एक्स्प्रेस, पुणे- संत्रागाछी एक्स्प्रेस, पुणे-हावडा दुरान्तो एक्सप्रेस, एसएमव्हीटी बंगळुरू- टाटानगर एक्स्प्रेस, योगनगरी- ऋषिकेश- पुरी एक्स्प्रेस, एलटीटी मुंबई- शालिमार एक्प्रेसचे मार्गात बदल करण्यात आला आहे.

Story img Loader