लोकसत्ता टीम
नागपूर: तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे आणि यार्ड रिमॉडलिंग कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान दररोज धावणारी गाडी बुधवारी रद्द करण्यात आली आहे.
ऐन उन्हाळ्यात रेल्वेगाड्या रद्द करण्याचा आणि विलंबाने चालवण्याचा रेल्वेने सपाटा लावला असून त्यामुळे प्रवासाचा नियोजित बेत रद्द करावा लागत असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. ३० मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आता जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेने २९ मे रोजी नागपूरहून निघणारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि ३० मे रोजी मुंबईहुन निघणारी मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रद्द केली आहे.