नागपूर: मुंबई पोलिस भरतीत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ११ व १२ जानेवारी रोजी घेण्यात आली. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या तीन पदांसाठी परीक्षा झाली. त्यातील कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदांची परीक्षा ११ जानेवारी रोजी आहे तर पोलीस शिपाई या पदासाठीची परीक्षा १२ जानेवारी रोजी झाली. या परीक्षेत राज्यभरातील विद्यार्थी अर्ज करतात. विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिली. परंतु, शनिवारी कॉपी करताना एकाला पकडल्यानंतर रविवारी वेगवेगळ्या केंद्रांवर पाच जणांना अटक करण्यात आली. ‘इलेक्ट्रिक डिव्हाइस’ आणि ‘इअर बर्ड’सोबत कॉपी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यासोबत बनावट हॉल तिकिटांचा वापरही समोर आला. यामध्ये चालकपदासाठी आलेल्या एकाचा, तर शिपाईपदासाठी आलेल्या चार उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सुरुवातीलाच या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शंका उपस्थित केली होती. तसेच परीक्षा घेताना कुठल्या उपाययोजना कराव्या अशा सूचनाही दिल्या होत्या. मुंबई पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू असून मैदानी चाचणीनंतर आता विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेतल्या जात आहेत. बोरिवली पूर्वेकडील एका शाळेतील केंद्रात एका उमेदवाराकडे ‘ब्ल्यू टूथ डिव्हाइस’ सापडले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरा प्रकार चेंबूर परिसरात समोर आला. खासगी कॉलेजमधील केंद्रात लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ‘व्हिझिटिंग कार्ड’सारखे उपकरण आढळले. पोलिसांनी ते उघडले असता, ते सिमकार्ड, बॅटरी आणि ‘इअर बर्ड’ने जोडले होते. दोन्ही विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत चांगले गुण मिळाले होते. या प्रकारामुळे अन्य उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा