चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला.

मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप – यूके’ (ओमपेग – युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित केली होती.

Pune Municipal Corporation has taken important decision for success of river improvement scheme
नदी सुधार योजनेच्या यशासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
modi meets jinping at brics summit
अन्वयार्थ : ‘ब्रिक्स’चा सांगावा
syrma sgs technology to set up electronics production
‘सिरमा’चा रांजणगावमध्ये उत्पादन प्रकल्प
mirae asset gold etf fund of fund for investing in gold
सोन्यात गुंतवणुकीसाठी ‘मिरॅ ॲसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड’
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…
Democracy Day in Kalyan Dombivli Municipality cancelled due to code of conduct
आचारसंहितेमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकशाही दिन रद्द
maratha reservation balaji kalyankar viral video
“तुम्ही स्वत:साठी पक्ष बदलता, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल; जरांगे पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…

हेही वाचा – नागपूर : लग्न जुळत नसल्याने मुलाने केली बापाला मारहाण

या संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री रवींद्र गाडगीळ, आशुतोष देशपांडे, अभिजीत देशपांडे आणि जय तहसीलदार यांच्या पुढाकाराने ही बैठक यशस्वी झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरे दिली. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या, सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या विविध कार्यक्रम आणि योजनांमधेही सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुनगंटीवार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे यांचे ऐतिहासिक महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्व, शिवराज्याभिषेकाचा यंदा होणारा त्रीशतकीय सुवर्णमहोत्सव, त्यानिमित्ताने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेले विविध कार्यक्रम यांची माहिती आपल्या वक्तव्यात दिली.

ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसोबत जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याविषयी झालेली प्राथमिक चर्चा यांची माहिती दिली. ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय ‘ओमपेग – युके’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘एसीबी’कडून मंत्रालयात वावर असलेल्या बुंदेलेची चौकशी; ‘आरटीओ’ला लाच मागण्याचे प्रकरण

मुनगंटीवार हे जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात आणण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्याकरता जेव्हा लंडनला जातील, तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आणि या दैवी कार्यात आवश्यक तो सर्व सहभाग देण्याचे लंडनस्थित मराठी उद्योजकांनी या आंतरजालीय दूरदृष्य प्रणाली बैठकीतून आश्वासन दिले आहे. त्याबद्दल मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याला लंडनस्थित मराठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.