वर्धा : घराचा कर तब्बल चाळीस चाळीस टक्के वाढवून बेपत्ता झालेल्या पालिका मुख्याधिकारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली. पण तरीही ऐकण्यास कुणीच नसल्याने पक्षनेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी आज संवाद साधला. महिन्यातील तीसही दिवस गैरहजर राहणारे सिंदी पालिकेचे मुख्याधिकारी न्याय कसा देणार, अशी विचारणा केली. सामान्य जनता पाच ते दहा टक्केच करवाढ सहन करू शकते. यापेक्षा ज्यास्त भरू शकत नाही, असे देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना स्पष्ट केले. हे प्रकरण लोकांतर्फे उचलून धरणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कर कमी न झाल्यास २१ जुलै रोजी विशाल मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहे. दाद मागायची सोय नाही. पालिका न्याय कसा देणार, असा लोकांचा सवाल आहे. याचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती वांदीले यांनी व्यक्त केली.
हाजीर हो! पालिका मुख्याधिकारी महिनाभर गैरहजर, माजी मंत्र्यांनी जिल्हाधिकऱ्यांशी साधला संवाद
घराचा कर तब्बल चाळीस चाळीस टक्के वाढवून बेपत्ता झालेल्या पालिका मुख्याधिकारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 16-07-2023 at 16:36 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal chief absent for a month ex minister interacted with district collector pmd 64 ysh