वर्धा : घराचा कर तब्बल चाळीस चाळीस टक्के वाढवून बेपत्ता झालेल्या पालिका मुख्याधिकारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली. पण तरीही ऐकण्यास कुणीच नसल्याने पक्षनेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी आज संवाद साधला. महिन्यातील तीसही दिवस गैरहजर राहणारे सिंदी पालिकेचे मुख्याधिकारी न्याय कसा देणार, अशी विचारणा केली. सामान्य जनता पाच ते दहा टक्केच करवाढ सहन करू शकते. यापेक्षा ज्यास्त भरू शकत नाही, असे देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना स्पष्ट केले. हे प्रकरण लोकांतर्फे उचलून धरणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कर कमी न झाल्यास २१ जुलै रोजी विशाल मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहे. दाद मागायची सोय नाही. पालिका न्याय कसा देणार, असा लोकांचा सवाल आहे. याचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती वांदीले यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा