नागपूर : कौटुंबिक वादातून मेहुण्याने जावयाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली. रवी गलीचंद कहार (३०, तिनसई, छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे तर अरुण अन्नू बनवारी (२४, गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात हत्याकांडाची मालिका सुरु असून मार्च महिना लागल्यानंतरही हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आले अमित शहांच्या मना, तिथे कुणाचे चालेना,” वर्धेत थाटले स्वतंत्र निवडणूक कार्यालय

हेही वाचा – “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

रवी कहार आणि अरुण बनवारी हे दोघेही बांधकाम मजूर आहेत. रवी हा अरुणच्या बहिणीचा पती आहे. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. सोमवारी रात्री दोघेही गप्पा करीत बसले होते. दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या अरुणने रवी याच्यावर काठीने हल्ला केला. जबर मार बसल्यामुळे रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपी अरुण त्याला मदत करण्याऐवजी पळून गेला. वेळेवर रुग्णालयात दाखल न केल्यामुळे रवी याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी श्याम कहार यांच्या तक्रारीवरून हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपी अरुणचा शोध घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder at beltarodi due to family dispute adk 83 ssb