बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील काटेल वडगावदरम्यान वान नदी पात्रात १ आठवड्यापुर्वी  अनोळखी व्यक्तीचे पुरलेला मृतदेह आढळला होता.दरम्यान कुजलेल्या मृतदेहावरील शर्टावरून तामगाव पोलिसांनी मृताची ओळख पटवून त्याच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावला आहे. संपत्तीच्या वादावरून पोटच्या मुलाने मित्राच्या मदतीने पित्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर सह  अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ जिल्ह्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी, संततधार सुरूच

Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
baba siddiquie murder plan
Baba Siddhique Murder case: ‘असा’ रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Ghatkopar West, two were attacked , bamboo ,
मुंबई : किरकोळ वादातून बांबूने मारहाण करून खून, एक जखमी
forest dept karad
कराड: मरगळलेल्या मोराची पाहुणचार; उपचार घेऊन पुन्हा आकाशी झेप

यापूर्वी वान शिवारात एका इसमाचा मृतदेह पुरला असल्याची माहिती तंटामुक्त अध्यक्ष थोरात यांनी तामगाव पोलीसांना दिली होती. ठाणेदार राजेन्द्र पवार, पोलीस उपनिरिक्षक विलास बोमटे, हवालदार रामकिसन माळी, जमादार अशोक वावगे, विकास गव्हाड घटनास्थळी दाखल झाले. जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला . प्रेत हे पुर्ण सडल्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. प्रेताचे अंगावर असलेल्या मळकट पांढऱ्या रंगाचे शर्टाचे कॉलरवर इंग्रजीत कुळे टेलर्स, दानापूर असे लेबल होते. पोलिसांनी जागीच शवविच्छेदन करून  मृतदेहावर काटेल येथील हिंदु स्मशानभुमीमध्ये रितीरिजावाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले.    

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन

… अन् तपास सुरू

त्यानंतर संतोष श्रीराम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोलीस स्टेशन तामगांव येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ नुसार घटनेची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक विलास बोपटे यांनी तपास सुरू केला. ठाणेदार राजेंद्र पवार यांनी जमादार विकास गव्हाड यांचेसह दानापुर (ता. तेल्हारा, जिल्हा अकोला) गावात जावुन मृतकचे शर्टावर असलेल्या लेबलवरुन कुले टेलर यांची भेट घेतली.  मृतकचे छायाचित्र आणि ‘ शर्ट’ फोटो दाखवुन चौकशी केली असता शर्ट हा गावातीलच अशोक विष्णु मिसाळ यांचे असल्याचे  सांगीतले. त्यावरुन अशोक विष्णु मिसाळ यांचे घरी जावुन पाहणी केली असता सदरचा इसम हा मागील तीन ते चार दिवसांपासुन गावात नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले .  नातेवाईकांची ‘कडक भाषेत’ विचारपुस केली असता १३ जुलै रोजी दुपारी (मृत) अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ (राहणार जामोद तालुका जळगांव  जिल्हा बुलढाणा) हा भेटीसाठी  दानापूर येथे आला होता.  रात्रभर अशोक मिसाळ यांचे सोबत  राहून  दुसरे दिवशी परस्पर कोणालाही काही न सांगता जामोद येथे निघुन गेला. तेव्हापासुनच अशोक मिसाळ हे सुध्दा गायब असल्याचे तपासात आढळून आले.  तसेच अशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासुन मागील विस वर्षांपासून वेगळे राहत होते. अशोक मिसाळ हे त्यांचे नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाचे नावावर करुन देत नव्हते. तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत अशोक मिसाळ व त्याचा मुलगा प्रविण उर्फ शुभम याचेसोबत नेहमी दानापुर येथे येवून वाद होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

दरम्यान प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन तांत्रीक पुरावे प्राप्त करण्यात आले. त्यावरुन प्रविण मिसाळ हा १३ जुलै च्या  दुपारपासून रात्रीपर्यंत दानापुर येथे हजर होता व याअगोदर सुध्दा त्याने अशोक मिसाळ याचेसोबत मालमत्तेची वाटणी  करण्याचे कारणावरुन वाद केल्याचे निष्पन्न झाले.

चौकशी अधिकारी विलास बोपटे यांना मर्गमधील अनोळखी  इसम हा अशोक विष्णु मिसाळ (वय ५० वर्ष रा. दानापुर ता. तेल्हारा जि. अकोला) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याची हत्या  मुलगा प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ (वय २४ वर्ष रा. जामोद )यांनी संपत्तीच्या हिस्से वाटणीवरून  केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे  कलम १०३ (१), २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा करुन  तपास पोउपनि जिवन सोनवणे यांचेकडे देण्यात आला, जिवन सोनवणे,  विकास गव्हाड, प्रमोद मुळे यांनी  फरार प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ रा. जामोद यांस शिताफीने पकडले. त्याला  कडक  भाषेत विचारले असता तो पोपटासारखा बोलु लागला. त्याने वडील अशोक विष्णु मिसाळ यांची जामोद येथील त्याचा मित्र राहुल रामदास दाते (वय २५ वर्ष) याचे  अशोक मिसाळ यांचा  गळा आवळून खून केला. मोटारसायकलने काटेल शिवारातील वान नदीचे कोरडे पात्रात नेवून पुराव नष्ट करण्याचे उददेशाने दगडे व गोट्यांचे सहायाने झाकले, अशी कबुली दिली. पोलिसांनी  जामोद येथील राहुल रामदास दाते यांस ताब्यात घेतले.

Story img Loader