नागपूर : जयताळा परिसरात घडलेल्या हत्याकांडाचा छडा लावण्यात प्रतापनगर पोलिसांना यश आले. प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने दगडाने ठेचून खून केल्याचे तपासास उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना अटक केली. या हत्याकांडात पत्नीलाही आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुनील बाहेकर, खुमेश दमाहे आणि रोहित नागपुरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजराज रामेश्वर डोमडे (३०, पन्नासे लेआउट, सोनेगाव) आणि ममता (२५) यांनी सहा वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह झाला होता. गोंदियातील आमगाव येथून दोघेही कामाच्या शोधात नागपुरात आले होते. दोघांचाही संसार सुरळित सुरू होता. त्यांना ५ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी आहे. भोजराज हा सेंट्रींगच्या कामावर जात होता. यादरम्यान, त्याचा मित्र सुनील बाहेकर याच्याशी ओळख झाली. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान सुनीलची नजर ममतावर पडली. दोघांची मैत्री झाल्यानंतर सूत जुळले. दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते. भोजराज कामावर गेल्यानंतर सुनील त्याच्या घरी येत होता. याची कुणकुण भोजराजला लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीची समजूत घातली होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वी भोजराज कामावरून अचानक घरी परतला. घरात त्याला सुनील आणि पत्नी दोघेही नको त्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्याने सुनीलला मारहाण करीत त्याच्याशी मैत्री तोडली होती. ममता आणि सुनील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु, पती भोजराज हा त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. सुनीलने भोजराजची भेट घेऊन माफी मागत प्रकरण मिटविण्याची विनंती केली. तेव्हापासून घरातील वातावरण सुधरले होते.
हेही वाचा >>> बुलढाणा : अपंग महिलेवर अत्याचार ; आरोपीस आमरण जन्मठेप , जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
प्रियकराने दिली सुपारी
भोजराजचा काटा काढण्याचा सुनीलने कट रचला. त्याने ममताकडून पतीबद्दल माहिती घेतली. त्याने आरोपी खुमेश दमाहे आणि रोहित नागपूरे यांना १५ हजार रुपयांत सुपारी दिली. तसेच खून करण्यात मदत करण्याचे आश्वासनही दिले. कटानुसार, शनिवारी रात्री दहा वाजता भोजराजला दारू पाजण्याच्या बहाण्याने जयताळ्यात नेले. तेथे तिघांनी दगडाने ठेचून भोजराजचा खून केला. नाल्याच्या पाईपमध्ये मृतदेह लपून ठेवला. सोमवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले.
असा लागला छडा
पती बेपत्ता झाल्यानंतर पत्नी ममताच्या वागणुकीवर पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी ममती हिच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ काढला. त्यामध्ये पतीच्या बेपत्ता होण्याच्या वेळेत प्रियकर सुनीलशी वारंवार संपर्कात होता. ठाणेदार दीपक भिताडे यांनी हाच धागा पकडून हत्याकांडाचा छडा लावत तिघांना अटक केली.