नागपूर : प्रेमाच्या प्रकरणातून पाच ते सहा मित्रांनी वर्गमित्र  १७ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगावात घडली. शशांक तिनकर (शिरुड, बुटीबोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बादशहा ऊर्फ सौरभ पंधराम (१९) आणि शशांक यांची मैत्री होती. दोघेही एका महाविद्यालयात  होते. त्यांच्यात पैशावरून वाद होता.  दोघेही एकाच तरुणीवर प्रेम करीत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते.

गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही परस्परांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यादरम्यान, मौसम रामटेके नावाच्या मित्राने दोघांचेही मन वळून पुन्हा मैत्री करण्यासाठी प्रयत्न केले. बादशहाने शशांकला सोमवारी रात्री आठ वाजता डोंगरगाव परिसरात वाद मिटविण्यासाठी चर्चा करण्यास बोलावले. शशांक आणि मौसम हे दोघेही दुचाकीने डोंगरगाव परिसरात पोहचले. आरोपी बादशहा हा साथिदार विशाल, आकाश, हिमांशू आणि शैलेष यांना घेऊन तेथे पोहचला.

Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
Murder in Mumbai
Mumbai Murder : मुंबईतल्या गोराईमध्ये मृतदेहाचे सात तुकडे आढळल्याने खळबळ, हातावरच्या टॅटूने गूढ वाढवलं
Baba Siddique murder Accused Arrested
Baba Siddique Murder : मुंबई पोलिसांची दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >>> Samruddhi Highway: ‘समृद्धी’वर जबरी चोरी टोळी जेरबंद, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

मौसमने वाद मिटविण्यासाठी चर्चा सुरू केली असता बादशहा आणि त्याच्या साथिदारांनी मौसमला मारहाण करणे सुरु केले. त्यामुळे चिडलेल्या शशांकने बादशहाला कानशिलात लगावली. त्यामुळे बादशहाने चाकू आणि कटरने शशांकवर हल्ला चढविला. काही मिनिटातच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर मौसमने  पळ काढला. काही वेळाने मौसमने पोलिसांना माहिती दिली. हिंगणा पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. शशांकला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यास उशिर झाल्यामुळे शशांकचा रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी बादशहा पंधरामसह साथिदारांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.