लोकसत्ता टीम

अकोला: दोन्ही पायाने अपंग असलेल्या व्यक्तीची शहरातील वाशिम बायपास मार्गाजवळ हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. रणजीत देवराव इंगळे (४८, गंगा नगर, अकोला.) असे मृतकाचे नाव आहे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाशिम बायपास मार्गाजवळ एका व्यक्तीला मारहाण करून अंधारात टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. रणजीत इंगळे अशी त्यांची ओळख पटली. ते दोन्ही पायाने दिव्यांग होते. डोक्यावर वार केल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाची दुचाकी घटनास्थळी सुस्थितीत उभी होती. मारेकऱ्यांनी मारहाण करून त्यांना अंधारात टाकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस पुढील तपास करीत आहे.

आणखी वाचा-वाशीम : मृग नक्षत्र कोरडेच जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत

अकोल्यात हत्येचे सत्र

अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था गेल्या काही दिवसांपासून ढासळल्याचे चित्र आहे. हत्येचे सत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच वर्चस्वाच्या लढाईतून रेल्वेस्थानकाजवळ युवकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे.

Story img Loader