नागपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचे प्रियकराने अपहरण करून गळा आवळून खून केला. गळफास घेतल्याचा बनाव करीत मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र, पोलिसांनी हत्याकाडाचा छडा लावत प्रियकर-प्रेयसीसह चौघांना अटक केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये घडली. विजय रुपराव ठाकरे (३८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय ठाकरे हा शेतकरी असून त्याचे कनेरडोल येथील मेघा (३०) हिच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून संसार नीट सुरू होता. यादरम्यान मेघा हिची गावातच राहणाऱ्या शरद सूर्यभान ठाकरे (२८) याच्याशी ओळख झाली. नात्याने वहिणी लागत असल्यामुळे तो नेहमी घरी येत होता. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मेघा ही विवाहित असून एक मुलाची आई असल्याचे विसरून शरदच्या प्रेमात पडली.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

हेही वाचा – नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

शरद हा सधन शेतकरी असून त्यानेही मेघाला हवी ती मदत करीत प्रेमात गुंतवून ठेवले. दोघांच्याही प्रेमाची चर्चा गावात होत होती. त्यामुळे विजयने तिला अनेकदा विचारणा केली. परंतु, तिने केवळ मैत्री असल्याचे सांगून वेळ मारून नेली. गेल्या वर्षभरापूर्वी शरद आणि मेघा एकट्यात घरात चर्चा करताना विजयला दिसले. त्यामुळे त्याने मेघाला मारहाण करीत शरदशी प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र, मेघा ऐकायला तयार नव्हती. दोघेही चोरून लपून भेटत होते. वर्षभरापूर्वी अनैतिक संबंधावर वाद झाल्याने मेघा माहेरी निघून गेली. माहेरी असताना तिचे आणि शरदचे बिनधास्त प्रेमसंबंध सुरू होते. तो मेघाच्या माहेरी जाऊन भेटत होता. त्याबाबत विजय यांना माहिती मिळाली. १५ एप्रिलला विजय हा मेघाच्या माहेरी गेला आणि त्याने तेथे वाद घातला.

हेही वाचा – वाशीमचे सुपुत्र अमोल गोरे यांना वीरमरण, दोन सहकाऱ्यांना वाचवले

असा रचला कट

मेघाने प्रियकर शरद ठाकरेला फोन केला आणि पती विजयचा ‘गेम’ करण्यास सांगितले. मेघाच्या प्रेमात आंधळा झालेल्या शरदने लगेच आपले मित्र रुक्षपाल सेवकदास पाटील आणि केशव दिलीप भोयर यांना सोबत घेतले आणि मेघाचे माहेर गाठले. त्यांनी विजयचे अपहरण केले आणि जंगलात नेले. तेथे मेघा, शरद, रुक्षपाल आणि केशव यांनी विजयला मारहाण करीत गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह जंगलात फेकून देत आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पीएसआय शरद गायकवाड यांनी हत्याकांडाचा छडा लावत चौघांना अटक केली.

Story img Loader