अमरावती: यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव नजीकच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या अल्पवयीन युवतीच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून तिच्या मित्रानेच हत्या केल्याचे व नंतर आरोपीने तिच्‍या आत्महत्येचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत १७ वर्षीय युवती येरड बाजार (ता. चांदूर रेल्वे) येथील रहिवासी होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमर पांडुरंग राऊत (२२, रा. येरड बाजार) आणि अमोल रामचंद्र ठाकरे (३१, रा. दाभा पहूर, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी अमर राऊत याची मैत्री या युवतीसोबत होती. परंतु गेल्‍या काही दिवसांपासून अमरला तिचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय येत होता.

हेही वाचा… प्रयोगशील शेतकरी व कृषी पदवीधर ठरताहेत प्रेरणादायी! कृषी विद्यापीठाचा ‘आयडॉल’ उपक्रम

३ जुलै २०२३ रोजी त्याने मैत्रीणीला दुचाकीवर बसवून बाभूळगाव नजीकच्या जंगलात नेले, तेथे दोघांमध्‍ये वाद झाल्‍यानंतर आरोपीने युवतीची ओढणीने गळा आवळून हत्‍या केली. नंतर मृतदेह झाडाला लटकवून आत्‍महत्‍येचा बनाव केला. तळेगाव दशासर पोलिसांनी अमरला याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने मैत्रिणीच्या हत्येची कबुली दिली. अमरने झालेल्या प्रकाराची पूर्वकल्पना त्याचा मित्र अमोल ठाकरे यालाही दिली होती. मात्र, त्‍याने ही घटना लपवून ठेवली. न्यायालयाने दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of minor girl due to love affair in amravati mma 73 dvr