नागपूर: दोन दिवसांपूर्वी दोन व्यापाऱ्यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली. हिवरीनगर नंदनवन परीसतरात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. तुषार किशोर इंगळे (वय १८,रा. गुजर नगर, गंगाबाई घाट, नागपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारात अज्ञात आरोपींनी तुषार यांचा हिवरीनगर ते संघर्षनगर रस्त्यावरील दारुच्या भट्टीसमोर दगडाने ठेचून खून केला. मंगळवारी सकाळी सहा वाजता फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसला. नंदनवन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.