नागपूर : पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्यामुळे नागपुरात गुंडाराज सुरु झाले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दर दुसऱ्या दिवशी एक हत्याकांड घडत असल्याने उपराधानीतील नागरिक वेगळ्याच दशहतीत जगत आहे. मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटून आलेल्या एका कुख्यात गुंडाने आपल्याच मित्राची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. बुधवारीसुद्धा मध्यरात्रीच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गेल्या १० दिवसांतील उपराजधानीतील पाचवे हत्याकांड आहे. विक्की चंदेल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> चंद्रपूर : शेतात वीजप्रवाह सोडून चौघांनी चितळाची शिकार केली, पण…

हेही वाचा >>> नागपूरजवळ मालगाडी घसरली, रेल्वे गाड्या ठेवल्या थांबवून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश पाली आणि विक्की चंदेल दोघांनीही काही महिन्यांपूर्वी प्रतिस्पर्धी टोळीतील युवकाचा खून केला होता. त्या हत्याकांडात दोघेही मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. ते गेल्या काही दिवसापूर्वीच कारागृहातून पॅरोलवर सुटून आले होते. दोघेही दारु पिण्याच्या सवयीचे होते. विक्कीने गेल्या आठवड्यात राकेशचा भाचा शुभम याला शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. त्याने मामा राकेशकडे तक्रार केली. त्यामुळे चिडलेल्या राकेशने विक्कीचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी रात्री बारा वाजता पार्वतीनगरात विक्की चंदेल याला राकेशने बोलावले. तेथे राकेशने साथिदारांच्या मदतीने विक्कीला घेरून तलवार-चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून शुभम भांजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.