लोकसत्ता टीम

भंडारा: चार वर्षांपूर्वी एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या एका नराधमाने कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना २९ जून रोजी लाखांदूर तालुक्यातील आथली गावात घडली. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राजेश उर्फ ​​राजू व्यंकट शहारे, वय ३०, रा. आथली याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Educational institution director remanded in police custody for negligence in sexual assault case
लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी
maharashtra assembly winter session
तालिका सभाध्यक्षांच्या निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीला डावलले
pune yerawada jail fight between prisoners
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, कैद्याला बेदम मारहाण प्रकरणात दोघांवर गु्न्हा
pimpri murder of youth marathi news
पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून
Thane, Girl murder, murderer life imprisonment,
ठाणे : तरुणीचे हत्या प्रकरण, मारेकऱ्याला आजन्म कारावास
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

लाखांदूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी या आरोपीने गावातीलच एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला तुरुंगवास झाला होता. काही वर्षांची शिक्षा भोगून काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून त्याची सुटका झाली होती. मात्र २९ जून रोजी आरोपीने पुन्हा एका अल्पवयीन मुलीला लक्ष केले.

आणखी वाचा-नागपूर : अल्पवयीन पत्नीला माहेरी सोडून पतीचे पलायन

ही मुलगी गावालगतच्या शेतात एकटीच जाताना त्याला दिसली. त्याने तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना तो दिसताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि आपल्या घरात लपून बसला.

लाखांदूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार डोलीराम भोयर, राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले.

Story img Loader