लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भंडारा: चार वर्षांपूर्वी एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या एका नराधमाने कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना २९ जून रोजी लाखांदूर तालुक्यातील आथली गावात घडली. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राजेश उर्फ राजू व्यंकट शहारे, वय ३०, रा. आथली याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखांदूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी या आरोपीने गावातीलच एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला तुरुंगवास झाला होता. काही वर्षांची शिक्षा भोगून काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून त्याची सुटका झाली होती. मात्र २९ जून रोजी आरोपीने पुन्हा एका अल्पवयीन मुलीला लक्ष केले.
आणखी वाचा-नागपूर : अल्पवयीन पत्नीला माहेरी सोडून पतीचे पलायन
ही मुलगी गावालगतच्या शेतात एकटीच जाताना त्याला दिसली. त्याने तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना तो दिसताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि आपल्या घरात लपून बसला.
लाखांदूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार डोलीराम भोयर, राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले.