नागपूर : गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात २०२२ या वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरीसह इतरही काही गंभीर गुन्हे वाढले आहेत. परंतु गेल्या आठ वर्षांची सरासरी दाखवत गुन्हे कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.

पोलीस भवन येथे शुक्रवारी झालेल्या अनौपचारिक चर्चेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, २०२२ मध्ये शहरात गंभीर संवर्गातील गुन्हे खूपच कमी करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२३ मध्येही ही स्थिती कायम आहे. २०२२ मध्ये शहरात ६५ खून झाले होते, २०२३ मध्ये ७३ खून झाले. २०२२ मध्ये शहरात १०२ खुनाचे प्रयत्न तर २०२३ मध्ये ११० खुनाचे प्रयत्न झाले. २०२२ मध्ये शहरात १६७ दरोडे तर २०२३ मध्ये २३६ दरोड्यांच्या घटना घडल्या. २०२२ मध्ये शहरात ७३२ चोऱ्या तर २०२३ मध्ये ८३६ चोऱ्या झाल्या. २०२२ मध्ये २५० बलात्कार तर २०२३ मध्ये २४७ बलात्कार झाले. इतरही गुन्ह्यात कमी-अधिक वाढ वा घट झाली आहे.

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

हेही वाचा – गडचिरोली : रानटी हत्तींच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, आरमोरी तालुक्यातील शंकरनगरात मध्यरात्री थरार

शहरात २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्हे घडले तर २०२३ मध्ये ९ हजार २४५ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये किंचित गुन्हे वाढलेले दिसत असले तरी आरोपी पकडण्याचे प्रमाण २०२३ मध्ये वाढले आसून २०२२ मध्ये गुन्हे खूपच कमी राखण्यात पोलिसांना यश आले होते. हे गुन्हे खूपच कमी असल्याने यंदा थोडी वाढ दिसत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. तर यंदा मोबाईल मिसिंगऐवजी मोबाईल चोरीच्या नोंदी केल्याने चोऱ्या वाढलेल्या दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच गेल्या आठ वर्षांची सरासरी काढल्यास शहरात वर्षाला ९५ खून व्हायचे. ही संख्या २०२३ मध्ये ७३ आल्याने गुन्हे गेल्या आठ वर्षांची सरासरी करता कमी झाल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरातील निम्मे खून कौटुंबिक कलहातून झाले. या खुनाचा छडा लावणे कठीण असते. परंतु पोलिसांनी त्यात चांगले यश मिळवले. तर बलात्काराच्या सर्वाधिक घटना ओळखीच्या व्यक्तीकडून घडल्याचे निदर्शनात आल्याचेही अमितेश कुमार म्हणाले. यावेळी शहर पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हरवलेल्या ९४ टक्के महिलांना शोधण्यात यश

शहरात २०२३ मध्ये १ हजार ५४४ पुरुष आणि १ हजार ६९६ महिला आणि १३८ मुले आणि ३३८ मुली हलवल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी शिताफीने तपास करत ८६ टक्के पुरुष आणि ९४ टक्के महिलांना शोधण्यात यश मिळवले. मुलांमध्ये ९४ टक्के मुले आणि ९६ टक्के मुलींनाही शोधण्यात यश मिळवले. तर इतरांचाही शोध सुरू असल्याचे अमितेश कुमार म्हणाले.

व्यसनमुक्त नागपूरसाठी सर्वाधिक कारवाई

नागपूरला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान राबवले. त्यानुसार २०२३ मध्ये सर्वाधिक ४२३ गुन्हे दाखल करून ५५८ जणांना अटक केली गेली. त्यांच्याकडून ४ कोटी ७४ लाख ३९ हजार १९१ रुपयांचे अमदी पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई आणखी वाढवणार असल्याचे अमितेश कुमार म्हणाले.

हेही वाचा – सावधान! नागपुरात एकाच दिवसात सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; २४ तासांत इतके रुग्ण आढळले

३९ कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत

शहरात चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींकडून ३९ कोटी २६ लाख २५ हजार ८३४ रुपयांचा मुद्देमाल मिळवला. हा सर्व मुद्देमाल ५ हजार २६१ नागरिकांना परत केला गेल्याचीही माहिती यावेळी दिली गेली.

राज्यात सर्वाधिक स्थानबद्धतेची कारवाई

शहरात यंदा ६४ आरोपींवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. तर मोक्का अंतर्गत यंदा १८ गुन्हे दाखल झाले असून ११० संघटित गुन्हेगारांवर कारवाई केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.